आहारातून उपचार / Healing With Food

नुकतेच माझ्या वाचनात डॉक्टर अंजली मुखर्जी यांचे मराठी अनुवादित पुस्तक “आहारातून उपचार” हे आले. पुस्तकात खूप उपयुक्त माहिती सोप्या व ओघवत्या भाषेत दिली आहे. त्यातील थोडी माहिती, सध्या आपण ज्यांना  “Life style” आजार म्हणतो त्यांवर खाली संकलित केली आहे. जर ही तुम्हाला आवडली तर तुम्ही संपूर्ण पुस्तक जरूर वाचा.

आहारातून उपचार

कोलेस्टेरॉलवर मात

         दररोज दोन मोठे चमचे ओटचा कोंडा, कमी स्निग्धांश असलेल्या गरम दुधात घालून घ्या.

         सोयाबीन दररोज ७०/८० ग्राम पोटात गेले पाहिजे.

         रोज एक सफरचंद खा.

         शिजविलेल्या कपभर छोल्यांमध्ये (बेंगाल ग्राम) कांदा, टोमाटो, कोथिंबीर घाला आणि कोशिंबिरी सारखे खा.

         रोजच्या जेवणात कच्चा कांदा खा.

         नियमितपणे हिरवा रस (गव्हांकुर, कोथिबीर) प्या.

         रोज दोन चमचे आळशीचे चूर्ण खा.

         रोज दोन पाकळ्या लसून ठेचून खा.

         एक वाडगा भर काळे किंवा हिरवे चणे उकडून, सलाड बनवून खा.

         रोज विटामिन ई चा २०० ते ४०० IU चा डोस तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या.

         साखरेच प्रमाण कमीत कमी राहूद्या. 

 रक्तातील गुठळ्या कमी करा

ह्या पदार्थांचा उपयोग खाण्यात करा लसून, आलं, कच्चा कांदा, हिरवा मिरच्या, ढोबळ्या मिरच्या, ग्रीन चहा, कच्च्या भाज्या, जवसाचे तेल, जीवनसत्व च्या गोळ्या.

उच्च रक्तदाबावर चाप

तुमचा रक्तदाब नेहेमी १२०/८० च्या जवळपास असला पाहिजे आणि १४०/९० च्या पुढ जाताकामा नये.

         फळे, भाज्या भरपूर खा.

         लसूण खा. गाव्हान्कुरांचा रस प्या.

         मीठ कमी खा.

         धुम्रपान व दारू बंद करा.

 अतिआम्लता

         जालोपचार तुमचा दिवस एक लिटर पाणी पिवून सुरु करा. नंतर दिवसात ६/७ ग्लास पाणी प्या. पाणी एकदम न पिता थांबून थांबून प्या.

         काळ्या मनुका –  रोज ४/५ मनुका रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाव्यात. जास्त त्रास असेल तेंव्हा १५/२० मनुका खायला हरकत नाही.

 मधुमेह

         तुमचे वजन वाढले असल्यास ते ताबडतोब व्यायाम व योग्य आहाराने कमी करा.

         रोज ३०/४० मिनिटे चालण्याचा व्यायाम करा.

         मैद्याचे पदार्थ खाऊ नका. फळे आणि भाज्यांचे आहारातले प्रमाण वाढवा.

         तुमच्या आहारात जास्तीत जास्त तंतूंचा समावेश करा. ग्वार गम , सफरचंदाची साल, ओटचा कोंडा, चोथा असलेली फळे व भाज्या ह्यांचा आहारात समावेश असावा.

         कारलं दररोज उपाशी पोटी कपभर कार्ल्याचा ताजा रस घ्या. त्यात एक चमचा आवळ्याचा रस टाकल्यास उत्तम.

         आवळा दररोज ३/४ आवळे खाल्ले तर रोगप्रतिकारक शक्ती चांगलीच वाढते.

         मेथी दाणे –Type २ मधुमेहावर खूप फायदेशीर. दररोज सकाळी उठल्याबरोबर दोन चमचे मेथीचे चूर्ण खाल्ल्यास फयदा होतो.

पुस्तकाचे नाव – आहारातून उपचार – अनुवाद – सुनंदा अमरापूरकर

मूळ पुस्तक – Healing With Food by Dr. Anjali Mukherjee

1 Comment (+add yours?)

  1. surendra kelkar
    Oct 08, 2013 @ 12:19:58

    thank you and we will try to follow regards and thanks kelkars

    ________________________________

    Reply

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Blog Stats

  • 2,301 hits
%d bloggers like this: